ABOUT US

साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीमचा प्रवास 2011 साली सुरू झाला. आज या प्रवासाला 13 वे वर्ष सुरू आहे तो प्रवास एकट्याने जमेल तसा केला पण इथून पुढे जो प्रवास करायचा आहे त्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य लागणार आहे.

साक्षात्कार शेतकरी उत्पादक कंपनी लिमेटेड या कंपनीमध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या फायद्याचाच विचार केला जाणार आहे. केळीच्या टिशुकल्चर रोेपांमध्ये चांगल्या रोपाची किंमत, रोपांची कॉलिटी वेळेत रोपे देणे आणि केळीच्या लागवडी पासुन ते हार्वेस्टिंग पर्यंत शेतकर्याना सहकार्य करणे यावर लक्ष केंद्रित असेल.

जसे आपण केळी रोपांमध्ये केले तसे आपण “रामा अँग्रोटेकची” जैविक उत्पादन शेतकऱ्याच्या प्लॉटवर प्रत्यक्षात येऊन गरजेनुसार केळी पिकांच्या गरजा पूर्ण करणे केळी स्पेशल बायो समृद्धी आणखीन शेतकऱ्याचा काय फायदा होईल त्यासाठी  नक्कीच काम करणार आहोत!

केळीच्या रोपांच्या बुकिंगपासून ते केळी हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण सिस्टिम तयार झालेली आहे. भविष्यात आपल्या सर्वाच्या सहकार्याने आपण सर्व केळी Export चे launching करणार आहोत. एक छोटस रोपट लावणं आपलं काम आहे ते रोपट किती आणि कसं मोठं होणार हे आपला हातात नाही आपल काम आहे कि प्रमाणिक पणे नियमित कष्ट करणे.

MISSION

मी विक्रम सुभाष सावंत. वय 33 वर्ष, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा 2011 साली इंजिनिअरिंग सोडून येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेती करण्यास सुरुवात केली पहिल्यांदा केळी पिक लावण्याचा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की केळीची रोपे बुकिंग करून सुद्धा किंवा रोपाच्या किमतीपेक्षा ज्यादा पैसे देऊन सुद्धा रोपे वेळेत मिळत नाहीत केळीसाठी लागणारे ड्रीप ड्रीपचे साहित्य हे करत असताना शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणी येतात हे कळून चुकलं आणि लक्षात आलं म्हणूनच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी स्वतः अनुभवल्या आणि त्याच अडचणी प्रत्यक्ष शेतकऱ्याला येतात हे लक्षात आलं त्याच अडचणीवर मात करून शेतकऱ्याला यशस्वी करण्यासाठी जो शेतकरी प्रयत्न करून थांबला आहे त्याला खंबीर साथ देण्यासाठी. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याच स्वप्नातलं सुंदर असा घर त्याच घरासमोर स्वप्नातील सुंदर अशी गाडी मुलांचे उच्च शिक्षण आणि शेतकऱ्याच्या मुला मुलींचे धुमधडाक्यात लग्न झाले पाहिजे. 

Our VISION

आमचे ध्येय शेतकऱ्यांना प्रॉडक्ट विकणे नसुन त्याच्या गरजा पुर्ण करणे आहे असणार आणि राहणार आहे.

आम्ही केळीची टिशुकल्चर रोपे पुरवणे किंवा रामा अँगोटेकची जैविक उत्पादने पुरवणे एवढेच नसुन केळीच्या रोपांच्या बुकिंग पासुन केळीच्या मुळापर्यंत आणि केळीच्या मुळापासून केळीच्या पानापर्यंत आणि केळीच्या लागवडीपासून ते बॉक्स पर्यंत सर्व शेतकऱ्याच्या  गरजा पुर्ण करणे आहे

Shopping Cart
error: Content is protected !!